साहित्य
पाव किलो चिकन
एक चमचा गरम मसाला
एक चमचा लाल मिरची पावडर
एक चमचा मीठ
दोन चमचे तेल
एक चमचा जीरा
एक इंच अद्रक
अर्धी वाटी चण्याची डाळ
एक वाटी पालक
अर्धी वाटी मेथी
अर्धी वाटी दुधी
एक चमचा हळद
चवीनुसार मीठ
कृती
१) चिकन मॅरीनेट करण्यासाठी चिकन ला लाल मिरची पावडर गरम मसाला आणि मीठ लावून पंधरा मिनिटे बाजूला ठेवा
२) आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये एक चमचा जिरा टाका नंतर त्यात एक इंच अद्रक बारीक करून घाला
३) आता त्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घाला
४) आता यामध्ये दुधीचे तुकडे घाला चवीनुसार मीठ आणि हळद घाला
५) यामध्ये स्वच्छ धुतलेली पालक आणि मेथी घाला
६) सर्व भाज्या शिजल्यावर त्यात टमाटे घाला मिक्सरमध्ये किंवा हॅण्ड ब्लेंडर सर्व भाजी स्मॅश करून घ्या
७) आता यामध्ये चिकन घाला
८) चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्या चिकन शिजण्यासाठी पाच ते दहा मिनिटे लागणार
९) तयार आहे आपल्या ग्रीन चिकन
source