भरलेली कोंबडी हा पदार्थ सहजपणे सगळीकडे मिळत नाही. हॉटेलमध्ये गेलं आणि लगेच ऑर्डर दिली असंही होत नाही. ४-५ मित्रांना घेऊन हा बेत आधीच ठरवायला लागतो. एक दिवस आधीच त्याची ऑर्डर द्यावी लागते आणि मग जिथे अशी भरलेली कोंबडी मिळते तिथे जाऊन आडवा हात मारायला लागतो. फूडी आशिषने यावेळी पुण्यातील शनिवार पेठेतील हॉटेल रायामध्ये मिळणाऱ्या भरलेल्या कोंबडीची चव चाखली. सागरशेठ गायकवाड यांच्या या हॉटेलमध्ये अत्यंत चविष्ट अशी भरलेली कोंबडी मिळते. फूडी आशिष आणि त्याच्या मित्रांनी रिकाम्या पोटी या हॉटेलमध्ये जाऊन भरलेली कोंबडी फस्त केली. भरलेली कोंबडी कशी करतात, त्याचे काय वेगळेपण आहे हे समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
chicken recipe,sunday special recipe,kombdi rassa,chicken sukka,chicken recipes for dinner,dry chicken,chicken recipe food fusion,chicken sukka recipe marathi,chicken curry indian style,chicken recipe fry,chicken sukka recipe,chicken sukka masala,chicken sukka maharashtrian style,gavran kombdi rassa recipe,chicken rassa maharashtrian style