in

आईच्या हातची चिकन रेसिपी Chicken Curry Recipe | Spicy Chicken Recipe In Konkan

https://www.facebook.com/koknatlamumbaikar

आईच्या हातची चिकन रेसिपी Chicken Curry Recipe | Spicy Chicken Recipe In Konkan कोकणात गावी आई चुलीवर जेवण बनवत असते. आईच्या हातची चिकन रेसिपी खूप छान बनते. कोकणात गावी चिकनला सागोती बोलतात. खास गावरान पद्धतीने बनवलेलं झणझणीत, चमचमीत चिकन आईने बनवलेले आहे. कोकणी चिकन, आगरी चिकन, मालवणी चिकन या चिकन रेसिपी खास कोकणात लोकप्रिय आहेत. चिकन करी म्हणजे चिकनचे कालवण गावी कोकणात हाडाचे चिकन वेगळे करून बनवली जाते. या चिकन रेसिपी मध्ये कमाल असते ती गोडा मसाला ज्याला आपण वाटण किंवा वाटप बोलत असतो. हे वाटण ओलं सुकं खोबरे भाजून कांदे भाजून बनवले जाते. गावच्या घरघुती मसाल्यामध्ये तयार होणारी ही चिकन रेसिपी अतिशय चविष्ट बनते जीची चव तुमच्या जिभेवर कायम रेंगाळत राहील. चिकन रेसिपी तयार करत असताना फोडणीला सुद्धा महत्व आहे. तुमची फोडणी जर चांगली बनली तर चिकन ची करी कालवण रेसिपी एकदम भारी बनते. आईच्या हातच्या जेवणाला चव लाजवाब असते. चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू आईच्या हातची स्पायसी चिकन रेसिपी. #KonkaniChickenRecipe #MalvaniChickenRecipe #ChickenCurryRecipe #KonkaniFood #sforsatish
आईच्या हातची चिकन रेसिपी कशी बनते आई गावाला कोकणात असते तेव्हा ती हे सर्व जेवण चुलीवर बनवत असते परंतु आता ती मुंबईत आहे. तुम्ही तुमच्या घरी गावच्या पद्धतीने गावरान चिकन कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कशी फोडणी द्यायची, कशी ग्रेव्ही तयार करायची, कसं टेस्टी चिकन बनवायचं हे सर्व पाहण्यासाठी हा जरूर पहा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका !

Follow me on Facebook and Instagram

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

source

Creative & Fun CupCake Decorating Ideas | Yummy Dessert Recipes | Easy Cake Decorating Tutorials

Jolly Rancher Edible Straw